LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Davaki Nandan Gopala

2004

Ghabad Miloo De Mala

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हो
अरे घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
हे हे काय म्हणतंय रे हे काय जाणू बा
घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
अरं भंडार वाहीन तुला रे खंडोबा घबाड मिळू दे मला अहा
घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला अहा
घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला हो

बारा कोसावर एक वाळी आहे वाळी आहे
तिथं एक मारवाळी आहे मारवाळी आहे
त्याचा मोठा वाळा आहे बाप्पा बाप्पा बाप्पा
अन्‌ त्यावर महादरो आहे अगं अगं अगं अगं
आता पाहू दे मणभर सोनं मला रं भंडार वाहीन तुला
घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला
घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला हो

मणभर सोनं ह्याले पाहिजे
कोणासाठी स्वतःसाठी
अन्‌ खंडोबाले देणार काय हयद नुसती दोन चिमटी
बाप्पा हा सौदा झाला
लेकरू होऊ दे मले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले
लेकरू होऊ दे मले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले
बकरू कापीन तुले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले
लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला हा
लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला हो
मी अन्‌ माह्या दोन सवती दोन सवती
कोन्या एकीलेही नाई संतती
अर रं रं रं हि तर वंशी झाली रं
त्याहींच्या आंधी कुरपा कर माह्यावरती हिच्यावरती
लोटांगण घालतो तुह्या पायावरती
लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला
लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला हो
दगडाचा देव घेत नाही देत नाही
पापाची साथ कुणी करत नाही
नवसानं पोर कोणाले होत नाही
माणूस खादाळ देव काही मांगत नाही
देव म्हनता का धोंड्याला
धान म्हनता का कोंड्याला
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

WRITERS

G.D. MADGULKAR, RAM KADAM

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other