रमा माधवांचे जिथे चित्त लागे
जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे
जिथे मोरया मूर्ती पद्मासनात
दिसे वामशुंडा नि मुद्रा निवांत
जिथे मोरया मूर्ती पद्मासनात
दिसे वामशुंडा नि मुद्रा निवांत
असा भक्त चिंतामणी पाहू या
असा भक्त चिंतामणी पाहू या
बघे देव प्राचीवरी सुर्यबिम्बा
तया पाहते कौतुके माय अंबा
बघे देव प्राचीवरी सुर्यबिम्बा
तया पाहते कौतुके माय अंबा
पदी पद्म त्याच्या चला वाहू या
पदी पद्म त्याच्या चला वाहू या